रश्मी शुक्ला मुंबईच्या पोलीस कमिशनर ?

मुंबई पोलीस कमिशनर विवेक फणसळकर आणि महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश शेठ यांच्या नियुक्त्या होउन फार दिवस झालेले नाहीत आणि या दोघांचाही कार्यकाळ अजून दोन वर्षे आहे . मात्र मुंबई पोलीस कमिशनर पदावर किंवा डीजीपी पदावर महाविकास आघाडी सरकारमध्ये वादग्रस्त ठरलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली जाईल असे संकेत मिळू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसात रश्मी शुक्ला यांनी मुंबईत प्रथम उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या पाठोपाठ दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ही चर्चा सुरु झाली आहे.

रश्मी शुक्ला या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची प्रतीनियुक्ती सध्या सीआरपीएफ मध्ये असून तेथे त्यांचा कार्यकाल २०२४ पर्यंत आहे. मात्र केंद्र आणि महाराष्ट्र सरकार त्यांना परत महाराष्ट्र केडर मध्ये आणू शकते. डीजी रँकच्या मुंबई मध्ये आठ पोस्ट आहेत. या सर्व रँक अधिकारी आणि विवेक फणसळकर व रजनीश शेठ यांच्यापेक्षा रश्मी शुक्ला सिनियर आहेत. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्या विरुध्द पुणे आणि कुलाबा येथे एफआयआर आणि चार्जशीट दाखल केले गेले आहे. महाविकास आघाडी सरकारने ही कारवाई केली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली होती कारण शुक्ला आयपीएस असल्याने केंद्राच्या अखत्यारीत येतात.

शुक्ला यांच्यावर दाखल करण्यात आलेले एफआयआर राजकीय हेतूने केले असल्याचे आणि जाणूनबुजून त्यांचा अपमान करून त्यांना त्रास दिला गेल्याचे बोलले जात आहे. त्या मुळच्या उत्तर प्रदेशच्या असून २४ व्या वर्षी आयपीएस झालेल्या आहेत. त्याचे पती सुद्धा आयपीएस होते पण त्यांचे निधन झाले आहे. पुणे कमिशनर सह अनेक महत्वाच्या पदांवर रश्मी शुक्ला यांनी काम केलेले आहे.