नवरात्रीत या द.आफ्रिकी खेळाडूने घेतले मंदिरात दर्शन

हैद्राबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी २० शृंखला जिंकल्यावर टीम इंडिया द. आफ्रिकेविरुद्ध टी २० मालिका खेळत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी द.आफ्रिकेच्या केशव महाराज या अष्टपैलू खेळाडूने मंदिरात देवी दर्शन घेतले असल्याचे समजते. हिंदू देवदेवतांच्या बद्दल केशवच्या मनात खास स्थान आहे. केशव महाराज याने पारंपारिक धोतर नेसून तिरुवनंतपूर येथील पद्मनाभ मंदिरात पूजाही केली. त्याचे फोटो त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

द.आफ्रिका भारतात प्रथम टी २० आणि नंतर वन डे सिरीज खेळणार आहे. केशव महाराजने भारतीयांना नवरात्रीच्या शुभेच्छा देताना फोटो मध्ये ‘जय माता दी’ असेही लिहिले आहे. ७ फेब्रुवारी १९९० मध्ये डर्बन येथे केशवचा जन्म झाला असून त्याचे वडील आणि आजोबा दोघेही क्रिकेटपटू होते. केशव डावखुरा स्पिनर आहे. त्याचे आजोबा हनुमान भक्त होते. द. आफ्रिकेत राहताना सुद्धा हे कुटुंब हिंदू रितीरिवाजा प्रमाणे सन उत्सव साजरे करतात.