जगात मंदी आली तरी भारतीयांना दोन आकडी पगारवाढ मिळणार

ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म एओन (एओएन)च्या रिपोर्ट नुसार भारतात २०२३ मध्ये सरासरी पगारवाढ १०.४ टक्के असेल. २०२२ मध्ये हाच आकडा १०.६ टक्के होता. जगभर मंदीचे संकेत दिले जात आहेत आणि अमेरिकेत संभावित मंदी येणार याविषयीच्या चर्चा जोरात सुरु आहेत. अमेरिकेतील मंदीचा परिणाम भारताच्या अर्थक्षेत्रावर होत असतो. त्यामुळे सरकार आणि कंपन्या काहीश्या काळजीत होत्या. पण नव्या रिपोर्ट नुसार आर्थिक मंदी आली तरी भारतातील कर्मचार्यांच्या पगारवाढीवर त्यांचा फारसा परिणाम होणार नाही.

२०२२ च्या पहिल्या सहामाहीत नोकऱ्या सोडण्याचे प्रमाण २०.३ टक्के होते. हाच ट्रेंड आणखी काही महिने सुरु राहील. एओनचे भागीदार रुपांक चौधरी यांच्या मते जागतिक पातळीवर मंदी असेल आणि महागाईमध्ये चढउतार दिसले तरी पगारवाढ डबल डीजीट मध्ये असेल. उद्योजकांनी आपले कामगार भविष्यात आपल्यासोबतच राहतील आणि काम सोडून जाणार नाहीत यासाठी काही निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. यंदा ई कॉमर्स क्षेत्रात पगारवाढ सर्वाधिक म्हणजे १२.८ टक्के असेल. स्टार्टअप मध्ये हीच वाढ १२.७ तर हातेक इन्फो टेक्नोलॉजी क्षेत्रात ११.३ टक्के असेल. वित्तीय क्षेत्रात हे प्रमाण १०.७ टक्के असेल असे अंदाज आहेत.