आयफोन १४ चे उत्पादन भारतात सुरु, चीनला झटका

अॅपलने त्यांचा नवा आयफोन १४ लाँच होऊन तीन आठवडे होत नाहीत तो त्याचे उत्पादन भारतात सुरु केले आहे. अॅपलचे मुख्य उप्तादन केंद्र चीन असले तरी गेले काही दिवस कंपनी चीनवरील अवलंबित्व कमी करायच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आयफोन १४ सादर होताच त्याचे उत्पादन फॉक्सकॉनच्या पेराम्बदूर यथील केंद्रात सुरु झाल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. यामुळे केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचा वेगाने विकास होण्यास हातभार लागणार आहे. जगभरातील इलेक्ट्रोनिक दिग्गज यामुळे भारताकडे आकर्षित होतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

ब्लूमबर्ग न्यूज नुसार अॅपल बहुसंख्य आयफोन चीन मध्येच तयार करते पण कंपनी गेले काही दिवस चीनला पर्याय शोधत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिका सरकार यांच्यात वारंवार संघर्ष होत आहे आणि चीन मध्ये वारंवार लावल्या जात असलेल्या लॉकडाऊन मुळे कंपनीची आर्थिक गणिते बिघडत आहेत. फॉक्सकॉननेच प्रथम चीन मधील शिपिंग घटक प्रक्रियेचा अभ्यास करून त्या संदर्भात कंपनीला अहवाल दिला होता आणि दक्षिण भारतातील चेन्नई बाहेर आपल्या प्रकल्पात आयफोन १४ असेम्बल करायची सुरवात केली असे समजते. भारतात बनणारे आयफोन १४ निर्यात सुद्धा केले जाणार आहेत.