अनिल अंबानींना मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने दिली करचुकवेगिरी प्रकरणी तात्पुरती स्थगिती


मुंबई : 420 कोटी रुपयांच्या करचोरीप्रकरणी रिलायन्स समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत अनिल अंबानी यांच्यावर कठोर कारवाई करू नये, असे न्यायालयाने आदेश आयकर विभागाला दिले आहेत.

रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर काळा पैसा कायद्यांतर्गत खटला चालवण्याची मागणी करणाऱ्या कारणे दाखवा नोटीसवर 17 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी प्राप्तिकर विभागाला दिले.

8 ऑगस्ट 2022 रोजी, आयकर विभागाने अंबानींना दोन स्विस बँक खात्यांमध्ये ठेवलेल्या 814 कोटींहून अधिक अघोषित पैशांवर 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल नोटीस बजावली होती.