नासाचे ‘डार्ट’ आज उल्केला देणार धडक, जगातील पहिला प्रयोग

अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हणजे नासाने बनविलेल्या डार्ट म्हणजे डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्टचा जगातील पहिला वापर आज होत असून डार्ट आज १.१ कोटी किलोमीटर दूर असलेल्या एका उल्केला धडक देणार आहे. या टकरीच्या उद्देश ती उल्का नष्ट करणे हा नाही तर तिची कक्षा बदलणे हा आहे. पृथ्वीजवळून अनेकदा असे मोठे अॅस्ट्रॉईडस किंवा उल्का वेगाने जात असतात आणि त्यांची धडक पृथ्वीला बसली तर फार मोठे नुकसान होऊ शकते. अश्या धडाका टाळण्यासाठी त्या उल्केची दिशाच बदलायची अश्या स्वरूपाचा हा प्रयोग आहे.

डार्ट हे अंतराळातील कुठल्याही उल्केला धडकणारे जगातले पहिले स्पेस मिशन आहे. आज म्हणजे २६ सप्टेंबर रोजी अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी ७ वा.१४ मिनिटांनी ही धडक होईल तेव्हा भारतात २७ सप्टेंबरची ४.४४ मिनिटे झाली असतील. ही उल्का डायफॉर्मस स्वरुपाची आहे. म्हणजे यात एका मोठ्या उल्केच्या भोवती दुसरी छोटी उल्का फेऱ्या मारत आहे. डायफोर्मस म्हणजे छोटी उल्का आणि डीडमॉस म्हणजे मोठी उल्का. मोठी उल्का २५६० फुट लांबीची असून ती सूर्याभोवती फिरते आहे. नासाचे डार्ट अभियान हे छोट्या उल्केला धडक देण्यासाठी आहे. डार्ट १९ मीटर लांबीचे असून २४ नोव्हेंबर २०२१ मध्येच लाँच केले गेले आहे.

दहा महिने प्रवास केल्यावर हे यान छोट्या उल्केच्या जवळ पोहोचले आहे. या टकरीचे काय परिणाम झाले ते समजण्यास काही महिने जावे लागणार आहेत. दरम्यान याचे फोटो घेण्यासाठी ७ ठिकाणी टेलिस्कोप काम करत आहेत. त्यात हबल, बेबस्पेस, नासाचे अॅस्ट्रॉईडस हंटिंग यान ‘ लुसी’ यांचाही समावेश आहे. डार्ट प्रतीतास २४ हजार किमी वेगाने छोट्या उल्केला टक्कर देणार आहे. त्यातून १० लाख किलो धूळ, दगडाचे तुकडे उडतील असा अंदाज आहे. डार्ट साठी सुमारे ३३ कोटी डॉलर्स म्हणजे २६ अब्ज रुपये खर्च केला जात आहे.