‘उमलिंग ला’ वर पोहोचणारी पहिली इलेक्ट्रिक कार ठरली टाटा नेक्सॉन मॅक्स

टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक नेक्सॉन मॅक्सने जगातील सर्वाधिक उंचीवरील मोटरेबल रोड उमलिंग ला वर पोहोचणारी पहिली इव्ही कार म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद केली. लदाखमधील उमलिंगला समुद्रसपाटी पासून १९०२४ फुट उंचीवर आहे. तज्ञ चालकांच्या एका टीमने लेह पासून प्रवास सुरु केला होता. १८ सप्टेंबर २०२२ रोजी हे रेकॉर्ड नोंदविले गेले. नेक्सॉन मॅक्स,कंपनीने नुकतीच लाँच केली असून नेक्सॉन इव्हीचे ते आधुनिक व्हर्जन आहे.

या कारला ४०.५ केडब्ल्यूएचचा बॅटरी पॅक दिला गेला असून ० ते १०० किमीचा वेग ही कार ९ सेकंदात घेते. कारसाठी दोन चार्जिंग पर्याय आहेत. स्टँडर्ड ३.३ केडब्ल्यूएच व ७.२ केडब्ल्यूएच एसी चार्जर. ही कार या चार्जरवर घरी अथवा कार्यालयात सहज चार्ज करता येते. कार मध्ये ३५० लिटरची बूट स्पेस असून एका फुल चार्ज मध्ये ही कार ४३७ किमी अंतर कापू शकते असा कंपनीचा दावा आहे.

या कारसाठी सिटी, स्पोर्ट आणि इको ड्राईव्ह मोडस दिले गेले असून व्हेन्टीलेटेड सीट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जिंग, ऑटो डीमिंग आयआरव्हीएम, एअर प्युरीफायर, क्रुज कंट्रोल, ऑटो ब्रेक लँप, हिल होल्ड, हिल डीसेंट कंट्रोल, ऑटो होल्ड, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ४ डिस्क ब्रेक दिले गेले आहेत. या कारची बेस प्राईज १८ लाख ३४ हजार तर टॉप मॉडेल ची किंमत २०.०४ लाख (एक्स शो रूम ) आहे.