आयफोन १४ प्रो मॅक्सचा डुप्लीकेट मिळतोय ६ हजारात

हुबेहूब आयफोन १४ प्रो मॅक्स सारखा दिसणारा आणि नीट पाहिल्याशिवाय दोन्हीतील फरक ओळखू न येणारा आय १४ प्रो मॅक्स चीनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. आणि विशेष म्हणजे खऱ्या आयफोन १४ च्या तुलनेत तो चक्क ९० टक्के स्वस्त मिळतो आहे. अॅपल ने त्यांची आयफोन १४ सिरीज नुकतीच लाँच केली असून या फोनच्या किंमती अमेरिकेत ९९९ डॉलर्स म्हणजे ८१ हजार रुपये तर अन्यत्र १७०० डॉलर्स म्हणजे १,३७,७०८ रुपये आहेत. याचा लुकलाईक म्हणजे हूबहु फोन मात्र ७२ डॉलर्स म्हणजे सहा हजारात मिळतो आहे.

या डुप्लिकेट फोन साठी ६.५१ इंची डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, ४ जी सेल्युलर नेटवर्क दिले गेले आहेत. बाहेरून हा फोन हुबेहूब आयफोन १४ प्रो मॅक्स सारखा दिसतो आणि त्यामुळे ग्राहक सहज फसू शकतील असा इशारा दिला गेला आहे. आयफोन १४ प्रोची नक्कल करणारे अनेक फोन बाजारात आले आहेत. त्यातील काही हाय एंड मॉडेल सुद्धा आहेत. त्यांना मिडिया टेक डायमेंस्टी ९००० चिपसेट दिला गेला आहे. चायनीज रिटेल प्लॅटफॉर्म १६८८ वर लिस्ट झालेल्या या फ्लॅगशिप व्हेरीयंट साठी १६ जीबी रॅम, १ टीबी स्टोरेज, ६.८ इंची डिस्प्ले आणि ७८०० एमएएच बॅटरी अशी फीचर्स असल्याचे नमूद केले गेले आहे.