अश्या गुप्त ठिकाणी आहेत काही देशाचे मिसाईल बेस
जगातील प्रत्येक देश स्वसंरक्षणासाठी सैन्यदले तयार करतो आणि त्यात सातत्याने वाढ केली जाते. विविध शस्त्रे, लढाऊ विमाने, तोफा, नौका, मिसाईल्स त्यासाठी खरेदी केली जातात, बनविली जातात. जगात आज अनेक देश अण्वस्त्रधारी आहेत आणि विविध प्रकारची मिसाईल्स त्यांच्या साठ्यात आहेत. या घातक शस्त्रांसाठी खास तळ निर्माण केले गेले असले तरी ती ठिकाणे अतिशय गुप्त राखली जातात. या संदर्भात माहिती देणारी एनटीआय डॉट ओआरजी या साईटवर अनेक देशांची अशी गुप्त ठिकाणे सांगितली गेली आहेत.
इस्रायल शस्त्र आणि युद्ध सामग्री या बाबत नेहमीच आघाडीवर असलेल्या देश राहिला आहे. अत्याधुनिक रडार, मिसाईल्स, संरक्षक प्रणाली यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. या देशच्या रामात हॅशरेन या ठिकाणी शस्त्रे, मिसाईल्स बनविण्याचे अनेक कारखाने असून तेथे ३२०० कर्मचारी काम करतात असे समजते.
भारताचे शेजारी आणि शत्रू देश म्हणजे चीन आणि पाकिस्तान. या दोन्ही देशांकडे घातक अण्वस्त्रे आहेत आणि हे दोन्ही देश युद्धखोर मानले जातात. चीन मध्ये चार मिसाईल बेस असून त्यातील दोन सक्रीय, एक ऑपरेशनल तर चौथा उभारणी होत असलेला आहे. जीयुक्वान स्पेस लाँच सेंटर, ताईयुआन स्पेस लाँच सेंटर, शिचांग स्पेस लाँच सेंटर आणि हैनान येथे चौथा बेस उभारला जात आहे. पाकिस्तानने भारताबरोबर १९६५,१९७१ आणि १९९९ मध्ये युद्ध केले आहे. त्यांचे मिसाईल बेस पंजाब सरगोधा येथे असून येथे दोन रनवे, एअरक्राफ्ट्स आणि शस्त्र साठे आहेत.
इजिप्तच्या मिसाईल बेस बद्दल फारशी माहिती मिळत नाही मात्र त्याची सर्व मिसाईल्स गेबेल हमजा टेस्ट रेंज वरून डागली जातात. आणखी एक युद्धखोर देश म्हणजे उत्तर कोरिया. देशाचे प्रमुख किम जोंग उन अमेरिकेला वारंवार अण्वस्त्र डागण्याच्या धमक्या देतो. हा देश वारंवार मिसाईल टेस्टिंग करतो. कोमडॉक सान या पर्वतावर उत्तर कोरियाचा मिसाईल बेस आहे असे म्हणतात.