Rupee vs Dollar : फेडच्या निर्णयानंतर रुपया 80.45 वर घसरला


नवी दिल्ली : रुपयाने आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे. गुरुवारी तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 80.28 रुपयांवर उघडला. याआधी बुधवारी रुपया 79.98 वर बंद झाला होता. बुधवारी रुपयाने 80.45 या सार्वकालिन नीचांकी पातळी गाठली. दुसरीकडे, डॉलरने गेल्या 20 वर्षांतील सर्वात मोठी झेप घेतली आहे.

महागाई नियंत्रित करण्यासाठी फेडने घेतला व्याजदर वाढवण्याचा निर्णय
अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने वाढती महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर 0.75 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. सलग तिसऱ्या वाढीनंतर बँकेचा बेंचमार्क फंड रेट 3% वरून 3.25% पर्यंत वाढला आहे. 2023 पर्यंत व्याजदर 4.6 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारतासह संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली आणि बाजार दिवसभराच्या खालच्या पातळीवर बंद झाला. डाऊ जोन्स 522 अंकांनी घसरून 30184 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे, Nasdaq 205 अंकांनी घसरला आणि 11,220 अंकांवर बंद झाला. S&P देखील 2% ने खाली आहे.