राजू श्रीवास्तव यांचे निधन, सर्वांचे आवडते ‘गजोधर भैया’ 42 दिवस देत होते मृत्युशी झुंज


देशातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात 42 दिवस भरती असलेले राजू श्रीवास्तव यांनी 21 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्टच्या पहाटे ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून ते एम्समध्ये व्हेंटिलेटरवर जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. राजू पहिल्या दिवसापासून बेशुद्ध होते. त्यांचे शरीर प्रतिसाद देत नव्हते. दोन दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली असली, तरी नंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना उत्तर दिले.

राजू श्रीवास्तव यांना वाचवण्याचा आणि शुद्धीवर आणण्याचा डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केला, पण ऑक्सिजन त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हता. ते सतत बेशुद्ध पडत होते. त्यांची अवस्था कोमासारखी झाली होती. राजू श्रीवास्तव यांच्या हृदयानेही काम करणे बंद केले. इंडस्ट्रीतील तमाम लोक आणि कोट्यवधी चाहते राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्यासाठी अखंड प्रार्थना करत होते, पण सगळ्यांना हसवणारे गजोधर भैय्या त्यांच्या मागे अश्रूंचा महापूर ठेऊन निघून गेले.

राजू श्रीवास्तव यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केले आणि सांगितले की त्यांचे हृदय देखील योग्यरित्या काम करत नाही. रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्या डोक्याच्या वरच्या भागात ऑक्सिजनही पोहोचत नव्हता. राजू श्रीवास्तव यांच्या शरीराचा खालचा भाग काम करत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना ऑक्सिजनचा सपोर्टही दिला जात होता. पण काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांना जबाब दिला.

राजूला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले
राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एम्समध्ये आणण्यात आले, तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि ते शुद्धीवर नव्हते. सीपीआरच्या मदतीने त्यांना कसेतरी शुद्धीवर आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर राजू श्रीवास्तव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये 2 स्टेंटही टाकण्यात आले. मात्र, त्यानंतरही राजूच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते.

अँजिओप्लास्टी करूनही सुधारणा नाही
यापूर्वी राजूच्या प्रकृतीबाबत त्यांच्या मुलीनेही सांगितले होते की, वडिलांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही. व्हेंटिलेटरवर असताना राजूचे शरीर औषध आणि उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. यानंतर राजूचा चुलत भाऊ अशोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ते म्हणाले होते, डॉक्टरांनी त्यांचे काम केले आहे. त्यांनी अँजिओप्लास्टी केली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी राजू श्रीवास्तवच्या बिझनेस मॅनेजरने एएनआयला सांगितले की, कॉमेडियनच्या शरीरात हालचाल होत आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे, मात्र ते अजूनही आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.

चित्रपटांमध्येही काम केले
राजू श्रीवास्तव यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, कानपूरमध्ये जन्मलेला हा कॉमेडियन त्याच्या कॉमेडीमुळे जगभर प्रसिद्ध होता. चित्रपटांमध्ये राजूने सलमान खानच्या मैने प्यार किया या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्यांनी ‘बाजीगर’, ‘आमदानी अठ्ठनी खरचा रुपैया’, ‘वाह तेरा क्या कहना’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘बॉम्बे टू गोवा’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

टीव्हीने दिली खरी ओळख
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी रिअॅलिटी शोमधून राजूला खरी ओळख मिळाली. या शोमध्ये राजूने गजोधर हे काल्पनिक पात्र साकारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. या टीव्ही मालिकेशिवाय राजूने ‘देख भाई देख’, ‘शक्तिमान’ आणि ‘अदालत’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.