हार्दिक पांड्याच्या ट्विटवर पाकिस्तानी अभिनेत्रीने उडवली भारतीय टीमची खिल्ली, चाहत्यांनी ट्रोल केले


टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक ट्विट केले होते. त्यावरुन पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने त्याची खिल्ली उडवली आहे. शिनवारीची खिल्ली उडवल्यानंतर भारतीय चाहत्यांनी तिला ट्रोल केले.


भारतीय संघाच्या पराभवानंतर पांड्याने सकारात्मक ट्विट केले. यामध्ये त्याने भारतीय खेळाडूंचे फोटोही समाविष्ट केले होते. पांड्याने लिहिले की, आम्ही शिकू. आम्ही सुधारणा करू. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे खूप खूप आभार. त्यावर सेहर शिनवारीने लिहिले, कृपया 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धचा पुढचा सामना हरा. या सामन्यातून तुम्हाला अधिक शिकायला मिळेल.

सेहरच्या या ट्विटनंतर भारतीय चाहत्यांनी तिला ट्रोल केले. ट्विटर युजर्सनी विविध कमेंट्स केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. यामध्ये हार्दिक पांड्याने नाबाद 71 धावांची खेळी केली.