महाराणीचे निधन- ट्वीटरने नोंदविले रेकॉर्ड

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरवर रेकॉर्ड ट्वीट केली गेली आहेत. महाराणीच्या संदर्भात ३०.२ दशलक्ष ट्वीट झाली असून ८ सप्टेंबर रोजी राणीचे निधन झाल्यावर हाच विषय या साईटवर सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. या एकाच दिवसात ११.१ दशलक्ष ट्वीट झाली.

@royal family जागतिक स्तरावर चौथे सर्वात उल्लेखनीय हँडल आहे, महाराणीच्या निधनानंतर १० लाखाहून अधिक ट्वीट झालीच पण सर्वाधिक रीट्वीट, ‘शाही परिवार राणी मृत्यू’ घोषणेवर झाली आहेत. १९ सप्टेंबर रोजी महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले असून त्यांचे पती प्रिन्स फिलीप यांच्या शेजारीच त्यांना दफन केले गेले आहे. महाराणीचे वारसदार म्हणून प्रिन्स चार्ल्स राजे बनले आहेत आणि त्यांनी राजेपद स्वीकारताच देशाच्या इतिहासात सर्वात दीर्घ काळ म्हणजे तब्बल ७० वर्षे उत्तराधिकारी राहण्याचे रेकॉर्ड केले आहे.