स्वदेशी स्मार्टफोन कंपनी लावाचा बजेट फोन २० सप्टेंबरला येणार

स्वदेशी स्मार्टफोन कंपनी लावा नवा फोन ब्लेझ प्रो २० सप्टेंबर रोजी सादर करणार असून त्याचे टीझर ट्वीटरवर जारी केले गेले आहे. त्यात फोनची काही फीचर्स उघड केली गेली असून हा बजेट स्मार्टफोन आहे. टीझर मध्ये बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनला कंपनी ब्रांड अँबेसीडर म्हणून ऑनबोर्ड आणत असल्याचे संकेत दिले गेले आहेत. हा फोन पांढरा, पिवळा, निळा आणि हिरवा अश्या चार रंगात उपलब्ध होणार आहे.

गतवर्षी कंपनीने लावा ब्लेझ सादर केला होता त्याचा हा नवा फोन सक्सेकर म्हणता येईल. फोनची किंमत ८६९९ रुपये आहे. लावा ब्लेझ प्रो ला ५० एमपी ट्रिपल रिअल कॅमेरा सेट दिला गेला आहे. जीएसएम अरेनाच्या रिपोर्ट नुसार या फोनसाठी ६.५ इंची एचडी प्लस, वॉटर नॉच डिस्प्ले दिला असून साईडमाउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन साठी ५ हजार एमएएचची बॅटरी दिली जाईल असे सांगितले जात आहे. ५० एमपी ट्रिपल कॅमेरा सेट ६ एक्स झूम सह आहे. फोन साठी ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले जाईल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.