मनीष सिसोदिया यांची गुजरात निवडणुकीत एन्ट्री, मिळाली ही जबाबदारी, करणार पक्षाचा प्रचार


नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता आम आदमी पक्षाने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही गुजरातमध्ये प्रचारासाठी उतरवले आहे. मंगळवार, 20 सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल वडोदरात प्रचार करणार आहेत. अरविंद केजरीवाल टाऊन हॉल मीटिंग आणि पत्रकार परिषदेला संबोधित करतील. बुधवार 21 सप्टेंबरपासून मनीष सिसोदिया गुजरातमध्ये परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. 21 सप्टेंबरला मनीष सिसोदिया अहमदाबादला पोहोचतील आणि त्यानंतर उत्तर गुजरातमध्ये यात्रा काढतील.

राघव चढ्ढा यांच्याकडेही आली गुजरातची जबाबदारी
गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करत असलेल्या आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांची गुजरातमधील पक्षाचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. राघव चढ्ढा यांनी गुजरातची जबाबदारी मिळाल्याबद्दल आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी जीवाची बाजी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. चड्ढा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, गुजरातला बदल हवा आहे, उत्तम शिक्षण-आरोग्य व्यवस्था हवी आहे. गुजरातला केजरीवालांची गरज आहे.