KRK : RSS मध्ये जाणार केआरके ? ट्विट करून म्हटलं- जर संघ…


स्वयंमघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता म्हणवणारा कमाल रशीद खान उर्फ केआरके सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा आपल्या ट्विटने लोकांना आश्चर्यचकित करतो. नुकतेच त्याने ट्विटरवर असे काही म्हटले आहे, ज्यामुळे तो चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादात सापडलेल्या केआरकेने यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

त्याने सोमवारी संघप्रमुख मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत आपण संघात येण्यास तयार असल्याचे लिहिले आहे. KRK ने ट्विट केले की, आदरणीय मोहन भागवत जी, RSS ला माझी गरज भासल्यास मी संघात येण्यास तयार आहे. या ट्विटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे. केआरके सध्या चित्रपटांपेक्षा राजकारणात जास्त रस दाखवत आहे. अलीकडेच त्याने एका ट्विटद्वारे सांगितले होते की, मी लवकरच एका राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे.


त्याने लिहिले, मी लवकरच राजकीय पक्षाचा भाग बनण्याचा विचार करत आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नसून नेता असणे आवश्यक आहे. त्याच्या या ट्विटवर अनेकांनी त्यांचे समर्थन केले. एका यूजरने लिहिले की, सर, तुमची पार्टी करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, उशीर झाला आहे. याशिवाय अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त करत त्याला विचारले की तू खरंच अभिनेता आहेस का?

दरम्यान केआरकेला त्याच्या जुन्या ट्विटमुळे मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्याने दिवंगत ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. अटकेनंतर त्याला 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच वेळी, त्याच्यावर 2021 मध्ये वर्सोवा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याला नऊ दिवस कोठडीत ठेवल्यानंतर न्यायालयाने दोन्ही गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला होता. त्याला हा जामीन सशर्त मंजूर करण्यात आला आहे.