हर्षल पटेलने T20 विश्वचषकासाठी केली विशेष तयारी, गोलंदाजीसह सुधारली फलंदाजीही


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताने वेगवान गोलंदाज हर्षल पटेलचा संघात समावेश केला आहे. हर्षल 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील झाला आहे. टीम इंडियाला त्याच्याकडून खूप आशा आहेत. दुखापतीमुळे तो आशिया कप 2022 मध्ये खेळला नव्हता. नुकतेच हर्षलने सांगितले की तो आता पूर्णपणे तयार आहे. त्याने आपल्या फलंदाजीसोबतच गोलंदाजीवरही मेहनत घेतली आहे.

त्याच्या गोलंदाजीबद्दल ईएसपीएनशी बोलताना हर्षल म्हणाला, मी माझ्या गोलंदाजीवर काम केले आहे. मी स्लो बॉल कोणत्या लांबीवर टाकायचा आणि तो कुठे जास्त प्रभावी ठरेल, यावर मी चांगले काम केले आहे. पूर्वी मी स्लो बॉल टाकायचो, तेव्हा तो लेन्थवर असायचा आणि आता मी शॉर्ट बॉलही टाकतो. मला वाटते की ते खूप प्रभावी होईल. मीही नवीन चेंडूने गोलंदाजी करत आहे. मला टीम इंडिया किंवा आरसीबीसाठी संधी मिळाली, तर मी त्यासाठी तयार आहे.

वेगवान गोलंदाज हर्षलने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा उल्लेख करताना सांगितले की, या दोघांनी मला खूप साथ दिली. तो फक्त मलाच नाही, तर संपूर्ण टीमला सपोर्ट करतो. त्याने मला संघातील माझ्या भूमिकेबद्दलही सांगितले आहे. यासोबतच संघात 8व्या क्रमांकावर असलेली माझी फलंदाजीही खूप महत्त्वाची असेल. मी बॉल आणि बॅटने अप्रतिम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन.