शी… भाज्यांवर लघूशंका करून होता विकत, व्हिडीओ व्हायरल होताच तुरुंगात पोहोचला


बरेली : बरेली जिल्ह्यात लघूशंका करून भाजीपाला विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. भाजीवर लघूशंका करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ज्याला तुरुंगात पाठवण्यात आले. शरीफ (55) असे आरोपीचे नाव आहे.

दुर्गेश कुमार गुप्ता या कार चालकाने बरेलीमध्ये भाजी विक्रेत्याला भाजीवर लघूशंका करताना पाहिले. त्याने गुपचूप व्हिडिओ बनवला. दुर्गेश कुमार हे हिंदू जागरण मंचचे सदस्य आहेत. दुर्गेशने पोलिसांना सांगितले की, मी जनकपुरी येथील कैलास हॉस्पिटलजवळून जात होतो. मी कामावरून गाडी थांबवली, यादरम्यान मला एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला गाडीखाली ठेवलेल्या भाजीवर लघूशंका करताना दिसली. मी मोबाईलवरून त्याच्या कृतीचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्यानंतर मी भाजी विक्रेत्याशी संपर्क साधला.

भाजी विक्रेत्याने आपले नाव शरीफ राहणार परतापूर चौधरी पोलीस ठाणे इज्जत नगर असे सांगितले. याउलट दुर्गेशने भाजीवर लघूशंका केल्याची माहिती देताच शरीफ यांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान वादावादी झाली, जमाव जमला. आजूबाजूच्या लोकांनी भाजी विक्रेत्याची बाजू घेतली. पण, जेव्हा मी भाजीवर लघूशंका करतानाचा व्हिडिओ दाखवला, तेव्हा त्याच्या बाजूने असलेल्या लोकांनी भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाण होताच शरीफ यांनी कैफियत मांडण्यास सुरुवात केली. माफी मागू लागला. म्हणाला मी 35 वर्षांपासून भाजी विकतो आहे, पहिल्यांदाच चूक केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आले. जमावाने शरीफला त्यांच्या ताब्यात दिले.

दुर्गेश कुमारच्या तक्रारीवरून, प्रेम नगर पोलिसांनी शरीफ यांच्याविरुद्ध जातीय वातावरण बिघडवणे, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि संसर्ग पसरवल्याबद्दल एफआयआर नोंदवून त्याला अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. एसएसपी आग्रा सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी सांगितले की, आरोपी व्हिडिओमध्ये हातगाडीच्या तळाशी ठेवलेल्या भाज्यांवर लघूशंका करताना दिसत आहे.