200 कोटींच्या जवळ पोहोचला रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’, शुक्रवारी केला एवढा व्यवसाय


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा चित्रपट ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिसवर ट्रेंड करत आहे. 9 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ बॉक्स ऑफिसवर दबदबा गाजवत आहे. वीकेंड ते वीकडे या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच 200 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. जो या वीकेंडला 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊन वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा आहे. ब्रह्मास्त्राचा आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. शुक्रवारी अनेक मोठे चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झालेले नाहीत. याचा लाभ ब्रह्मास्त्राला झाला आहे.

दुसऱ्या शुक्रवारीही ब्रह्मास्त्राचा ट्रेंड लोकांमध्ये कायम आहे. रणबीर आणि आलियाचा चित्रपट दुसऱ्या वीकेंडला चांगला व्यवसाय करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानंतर तो 200 कोटींचा टप्पा पार करेल. या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन दाक्षिणात्यपेक्षा चांगले काम करत आहे.

शुक्रवारी केला खूप व्यवसाय
‘ब्रह्मास्त्र’चे दुसऱ्या शुक्रवारचे कलेक्शन समोर आले आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ब्रह्मास्त्रने आठव्या दिवशी 10.25-11.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर एकूण कलेक्शन 181.50 कोटी झाले आहे.

शिवा हा ब्रह्मास्त्रचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. यासोबतच ‘देव’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही प्रेक्षक वाट पाहत आहेत. अयान मुखर्जीने घोषणा केली आहे की तो 2025 च्या अखेरीस ब्रह्मास्त्रचा दुसरा भाग रिलीज करणार आहे. ब्रह्मास्त्रच्या दुसऱ्या भागात कोणता स्टार देवच्या भूमिकेत दिसणार आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर-आलियासोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. चित्रपटातील मौनी रॉयच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांचा कॅमिओ आहे.