उझबेकिस्तान मध्येच आहे तैमुरची रहस्यमय कबर

शांघाई सहयोग संमेलनाच्या निमित्ताने उझबेकिस्तान पुन्हा चर्चेत आले असून येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे पुतीन, चीनचे शी जीन्ग्पिंग एकाच मंचावर हजर होते आणि त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष येथे काय घडते त्याकडे लागले होते. या निमित्ताने सम्राट तैमूरलंग याची कबर सुद्धा पुन्हा चर्चेत आली आहे. मंगोल शासन असलेल्या उझबेकिस्तानचे नावच मुळी तैमुरलंगचा नातू उझबेक याच्या नावावरून पडले आहे.

तैमुरलंगने भारतासह अनेक देशांवर कब्जा करून तेथे जुलमांची परिसीमा केली होती. त्याची जुलमी राजवट इतिहासातील काळे पान म्हणूनच ओळखली जाते. त्याच्या मृत्युनंतर सुद्धा त्याची दहशत कायम राहिली आहे. भारतासह अनेक देशावर त्याने कब्जा केला होता मात्र चीनवर कब्जा करण्यापूर्वी त्याचा १ एप्रिल १४०५ मध्ये मृत्यू झाला. त्याचे दफन समरकंद येथे केले गेले. शांघाई सहयोग संमेलन जेथे झाले तेथेच तैमुरची कबर आहे.

असे सांगतात कि तैमुरने त्याच्या मृत्युपूर्वी दोन वर्षे अगोदरच कबरीचे काम सुरु केले होते. या कबरीशी कुणी छेडछाड केली तर संबंधितावर वाईट परिस्थिती येते असे म्हणतात. या कबरीशी अनेक रहस्ये निगडीत आहेत. तैमुरलंगच्या कबरीवर अनेक मौल्यवान खडे जडविले गेले होते. इराणचा शाह नादिर शाह याला हे मौल्यवान खडे किंवा रत्ने आवडली म्हणून त्याने कबरीवरून हे खडे काढून १७४० मध्ये इराणला नेले. त्यानंतर नादिर शाहचे राज्य कोसळले. मग त्याने पुन्हा ते खडे तैमुरच्या कबरीवर आणून बसविले आणि परिस्थिती सुधारली असे सांगतात.

रशियाचा सर्वेसर्वा स्टॅलीन याने १९४१ मध्ये तैमुरची कबर खोदण्याचे आदेश दिले तेव्हा त्यातून दोन संदेश मिळाले. तैमुरचे दोन संदेश असे होते, जेव्हा मृत्युनंतर तो पुन्हा कबरीबाहेर येईल तेव्हा संपूर्ण जग हादरेल. जो कुणी कबर खोलेल त्याला शत्रूकडून पराभव स्वीकारावा लागेल. हा शत्रू माझ्यापेक्षाही भयंकर जुलमी असेल.

विशेष म्हणजे स्टॅलीनने जेव्हा ही कबर खोदली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ११ जून १९४१ ला हिटलरने सोविएतवर हल्ला चढविला. असे म्हणतात त्यानंतर स्टॅलीनने पुन्हा कबर होती तशी बंद करण्यचे आदेश दिले. कबर बंद केली तेव्हाच रशियात हिटलरच्या सेनेने सरेंडर केले आणि स्टॅलीनचा विजय झाला.