यंदाच्या दीपोत्सवात प्रथमच होणार ड्रोन शो

रामनगरी अयोध्येत यंदा दरवर्षी प्रमाणे दीपोत्सव साजरा केला जात केला जात आहे. यंदाच्या दिपोत्सवात ड्रोन शो हे मुख्य आकर्षण असून ५०० ड्रोनच्या सहाय्याने अयोध्येच्या आकाशात रामायणातील विविध प्रसंग पहाता येणार आहेत. यंदा अयोध्येत १४ लाख पणत्या प्रज्वलित करून नवीन गिनीज रेकॉर्ड स्थापण्याचा प्रयत्न केला जात आहे. राम कि पौडीवर थ्री डी होलोग्राफिक शो, थ्री डी प्रोजेक्शन मॅपिंग, लेझर शो अशीही खास आकर्षणे आहेत.

दीपोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरु झाली असून हा कार्यक्रम १ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर असा सहा दिवस आहे. पैकी ३ नोव्हेबर रोजी मुख्य कार्यक्रम होणार आहेत. त्यासाठी १२ हजार स्वयंसेवक तैनात केले गेले आहेत. गेली पाच वर्षे या महोत्सवाचे आयोजन केले जात असून सलग तीन वर्षे गिनीज बुक मध्ये जागतिक रेकॉर्ड नोंदविले गेले आहे. यंदा नव्याने रेकॉर्ड नोंदविले जाणार असून त्यासाठी कार्यक्रम स्थळी गिनीज बुक रेकॉर्ड टीम उपस्थित राहणार आहे. यंदा सात देशांच्या रामलीला सादर केल्या जात आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ड्रोन शो प्रथमच होत असून आकाशात भगवान रामाचे दर्शन होणार आहे.

गतवर्षी अयोध्येत दीपोत्सवात ९ लाख पणत्या प्रज्वलित केल्या गेल्या होत्या. यंदा १४ लाख पणत्या प्रज्वलित केल्या जाणार आहेत. आसपासच्या परिसरातील कुंभार मातीच्या पणत्या बनविण्याच्या कमी व्यग्र झाले आहेत असे समजते.