T20 World Cup 2022 : हार्दिक पांड्याने दाखवली टीम इंडियाच्या नवीन जर्सीची पहिली झलक, लॉन्चपूर्वी फोटो झाला व्हायरल


बीसीसीआयने सोमवारी (12 सप्टेंबर) आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बोर्डाने 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. विश्वचषक संघाच्या घोषणेनंतर, भारतीय संघाच्या अधिकृत किट प्रायोजक ‘एमपीएल स्पोर्ट्स’ने मंगळवारी खुलासा केला आहे की लवकरच संघासाठी एक नवीन जर्सी लाँच केली जाईल, जी खेळाडू आगामी टी-20 2022 विश्वचषकात परिधान करताना दिसतील.

MPL Sports’ ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पंड्या नवीन जर्सीमध्ये दिसत आहेत. नवीन जर्सीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चाहत्यांना नवीन जर्सीची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. जर्सीचा रंगही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

भारतीय संघाने सध्या परिधान केलेली जर्सी नेव्ही ब्लू आहे. पण एमपीएलने केलेल्या ट्विटवरून असे दिसते आहे की, यावेळी भारतीय संघाच्या जर्सीचा रंग आकाशी निळा असणार आहे. अशा परिस्थितीत भारताच्या T20 विश्वचषकाच्या जर्सीमध्ये काय खास असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर्सी अद्याप अधिकृतपणे लाँच केलेली नाही.