रणबीर-आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ ‘भूल भुलैया 2’चा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज, सातव्या दिवशी जमवला एवढा गल्ला


आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ब्रह्मास्त्र चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. 2014 मध्ये या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून ‘ब्रह्मास्त्र’ हा चर्चेचा भाग राहिला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला, असून तो सर्वांची मनं जिंकत आहे. चित्रपटातील व्हीएफएक्सला खूप पसंती दिली जात आहे. तसेच आलिया-रणबीरच्या केमिस्ट्रीचे खूप कौतुक केले जात आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. हा आकडा वाढत आहे. या आठवड्याच्या अखेरीस हा चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. ब्रह्मास्त्रचे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले असून हा चित्रपट लवकरच भूल भुलैया 2 चा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे.

आलिया आणि रणबीर अजूनही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ते अनेक कार्यक्रमांचा भाग असतात. आलिया, रणबीर आणि अयान मुखर्जी देशाच्या कानाकोपऱ्यात चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. त्यामुळे लोक तो चित्रपट बघणार आहेत. आता या चित्रपटाचे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

सातव्या दिवशी जमवला गल्ला
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ब्रह्मास्त्रने सातव्या दिवशी सुमारे 9.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन सुमारे 170 कोटी होईल. वीकेंडच्या तुलनेत आठवड्याच्या दिवशी चित्रपटाचा ट्रेंड कमी असतो, पण तरीही ब्रह्मास्त्र या आठवड्यात 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे.

मोडेल ‘भूल भुलैया 2’ चा रेकॉर्ड
ब्रह्मास्त्र हिंदीसह दक्षिणेतही चांगला व्यवसाय करत आहे. 170 कोटींच्या कलेक्शनमध्ये 150 कोटी हिंदी व्हर्जनचे आणि 20 कोटी साऊथ डबिंगचे आहेत. येत्या दोन दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’ ‘भूल भुलैया 2’ चा विक्रम मोडून या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार आहे. या यादीत काश्मीर फाइल्स पहिल्या क्रमांकावर आहे. ब्रह्मास्त्रचे बजेट खूप जास्त आहे.