Excise Policy : दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे


नवी दिल्ली : दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, नेल्लोर, चेन्नईसह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि यूपीमध्येही शोध सुरू आहेत.

यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 6 सप्टेंबर रोजी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यातील 30 ठिकाणी छापे टाकले होते.