एअर इंडियाला मिळणार नवे नाव, बदलणार रूप

टाटा ग्रुपने एअर इंडियाचा कायाकल्प करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे रीब्रांडीग केले जात असून त्यानुसार एअर इंडियाला नवे नाव दिले जात आहे. ‘विहान एआय’ असे हे नवे नाव असेल. पुढच्या पाच वर्षाच्या योजना कंपनीने तयार केल्या आहेत. बाजारात कंपनीचा हिस्सा वाढविण्याचा जोरदार प्रयत्न यातून केला जाणार आहे. स्थानिक तसेच परदेशी मार्केट मध्ये वेगाने हिस्सा वाढविण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले असल्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केम्पबेल विल्सन यांनी सांगितले.

विल्सन म्हणाले, ही आमच्यासाठी ऐतिहासिक परिवर्तनाबरोबर नव्या युगाची सुरवात आहे. कंपनी विमान संख्या वाढवत असून नवीन ३० विमाने सामील केली जात आहे. त्यात वाईड बॉडी आणि नॅरो बॉडी विमाने सामील आहेत. ग्राहकांमध्ये विश्वासार्हता वाढविण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात असून सर्व उड्डाणे वेळेवर होतील याची दक्षता घेतली जात आहे. टाटा ग्रुप नेहमीच भारतीय संस्कृती आणि भारतीय मानसिकता जपत आला आहे. त्यामुळे त्याच प्रमाणे जगभरातील ग्राहकांची सेवा केली जाणार आहे. जगात वैश्विक एअरलाईन स्वरुपात स्थापित होण्याचा आमचा प्रयत्न आहे.

विमान नियमक डीसीएसआयच्या आकडेवारी नुसार जुलै मध्ये एअर इंडियाने स्थानिक बाजारात ८.४ टक्के वाटा मिळविला आहे. ग्राहक अनुभव, मजबूत संचालन, उद्योग सर्वश्रेष्ठ प्रतिमा, उद्योग नेतृत्व व वाणिज्यिक दक्षता अशी पंच सूत्री कंपनी राबविणार आहे.