अशी आहे रॉजर फेडररची लव्ह स्टोरी

तब्बल २० वेळा ग्रँडस्लॅम विजेता ठरलेल्या स्वित्झर्लंडच्या टेनिस स्टार रॉजर फेडररने टेनिस मधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. लेवर कप ही त्याची शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यांच्या निवृत्तीने एका टेनिस युगाचा अंत होणार असल्याची भावना त्यांच्या चाहत्यांच्या मनात आहे. रॉजरने त्याच्या सर्व कारकिर्दीसाठी त्याचे सर्व प्रतिनिधी आणि पत्नी मिर्का यांना धन्यवाद दिले आहेत.

रॉजरने पत्नी मिर्काने नेहमीच त्याचा उत्साह वाढविला, त्याला करिअर मध्ये पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले आणि प्रेरणा दिली असे म्हटले आहे. पण रॉजर याच मिर्काच्या प्रेमात पाहताक्षणी पडला होता हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. त्यापेक्षा कमी लोकांना हे माहिती आहे कि मिर्का स्वतः टेनिस प्लेयर आहे. रॉजरची लव्ह स्टोरी फार वेगळी नाही पण तब्बल ९ वर्षे डेटिंग केल्यावर हे दोघे विवाह बंधनात अडकले होते.

रॉजर आणि मिर्का यांची पहिली भेट १९९७ मध्ये झाली आणि पहिल्याच भेटीत रॉजर तिच्यात अडकला. पण प्रेमाची कबुली द्यायला त्याला २००० साल उजाडावे लागले होते. त्यावेळी मिर्का आणि रॉजर दोघेही स्वित्झर्लंड कडून सिडने ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाले होते. तेथेच रॉजर तिच्यासाठी वेडा झाला. मिर्का ने २००२ मध्ये टेनिस पासून दूर होण्याचा निर्णय घेतला. फेडरर आणि मिर्का यांना दोन वेळा जुळी मुले झाली असून हे दोघे चार अपत्यांचे पालक आहेत. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा अॅवॉर्ड कार्यक्रमात रॉजर मिर्काला बरोबर घेतल्याशिवाय जात नाही आणि मिर्का सुद्धा त्यांच्या बहुतेक सर्व महत्वाच्या सामन्यांच्या वेळी स्टेडीयम मध्ये हजर असते. रॉजरच्या निवृत्तीनंतर हे दृश्य चाहते पाहू शकणार नाहीत.