नवी दिल्ली : भारतात कोरोना विरुद्धची लढाई अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, आज पुन्हा कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुमारे 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 6,422 नवीन रुग्ण आढळले आहेत. भारतात सक्रिय प्रकरणांची संख्या 46,389 वर पोहोचली आहे.
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 25 टक्क्यांनी वाढ, गेल्या 24 तासात 6,422 नवीनबाधितांची नोंद
बुधवारी देशात कोरोनाचे 5,108 नवीन रुग्ण आढळले. या कालावधीत 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच बुधवारी कोरोनाची लागण झालेले 5,675 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत.
वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6422 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचे 46,389 सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी देशात कोविड-19 चे एकूण सक्रिय रुग्ण 45,749 वर आले होते. यापूर्वी मंगळवारी सक्रिय प्रकरणे 46,347 होती. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 142 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, राजधानीत सक्रिय प्रकरणांची संख्या 575 आहे. 14 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 419 रुग्ण आढळले, तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला. पुद्दुचेरीमध्ये 58 नवीन कोविड प्रकरणे आणि 1 मृत्यूची नोंद झाली आहे.