येतेय फेरारीची पहिली फोर डोर, फोर सीटर एसयूव्ही

सुपर लग्झरी कार्स बनविणारी इटालियन फेरारी लवकरच त्यांची पहिली एसयुव्ही सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ही एसयूव्ही बेन्टले बेन्तायगा, लोम्बार्गिनी उरूस, मासरेट्टी लेवोटे, पोर्शे केयेन व अॅस्टीन मार्टिनच्या डीबीएक्स बरोबर टक्कर देईल. अर्थात फेरारीची ही लिमिटेड एडिशन कार आहे आणि कंपनी तिचा उल्लेख एसयुव्ही असा करणार नाही. कारचे नामकरण पुरोसांग असे केले गेले आहे.

नव्या एसयूव्हीचे डिझाईन क्रॉस ओव्हर प्रमाणे आहे. चार दरवाजे आणि चार प्रवासी बसण्याची सोय असलेली फेरारीची ही पहिलीच कार आहे. तिचा बॉडी टाईप एसयूव्ही प्रमाणे आहे. कंपनीचे सीईओ बेनेडेटो विग्ना यांनी ही कार आम्ही एसयूव्ही म्हणून पाहत नाही असे स्पष्ट केले आहे. आजपर्यंत कंपनीने फक्त दोन सीटर कार्स बनविल्या आहेत. मात्र या नव्या लिमिटेड एडिशन पुरोसांगचे दरवाजे ७९ डिग्री कोनात उघडतात त्यामुळे प्रवासी सहजतेने चढ उतर करू शकतात. मागच्या प्रवाशांसाठी चांगली लेग स्पेस दिली गेली आहे. सामानासाठी ४७० लिटर बूट स्पेस आहे.

फेरारी पुरोसांगला ६.५ लिटरचे व्ही १२ इंजिन दिले गेले असून ही कार ऑलव्हील ड्राईव्ह कार आहे. ० ते १०० किमीचा वेग ती अवघ्या ३.३ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३१० किमी. या कारची किंमत साधारण ४ लाख डॉलर्स म्हणजे ३.१५ कोटी रुपये असेल असे समजते.