अपघातातून बालंबाल बचावले युक्रेन राष्ट्रपती झेलेन्स्की

युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की राजधानी कीव मधून जात असतांना झालेल्या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. त्यांना कोणत्याही गंभीर स्वरुपाची दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार झेलेन्स्की यांचा काफिला रस्त्यातून जात असताना एका बाईकने झेलेन्स्की यांच्या कारला धडक दिली. झेलेन्स्की यांचे प्रवक्ते निकीफोरोव यांनी फेसबुकवर दिलेल्या पोस्ट नुसार स्थानिक वेळ १ वा.२२ मिनिटांनी कीव येथे एका बाईकने झेलेन्स्की यांच्या कारला धडक दिली. झेलेन्स्की यांच्या कार मध्ये त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या डॉक्टरने त्वरित बाईक चालकावर उपचार करून त्याच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि मग झेलेन्स्की यांची तपासणी केली.

या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत. युक्रेन युद्ध आता अंतिम टप्प्यात आले असून युक्रेन सेनेने रशियन सैन्याला पूर्व भागातून उखडून लावले आहे. सुमारे सहा महिन्यांच्या युद्धानंतर युक्रेनने रशियन सैनिकांनी ताब्यात घेतलेल्या रणनीतिक महत्वाच्या इजीयम शहरावर पुन्हा कब्जा केला आहे आणि डोनाबास अजूनही रशियन सेनेला जिंकता आलेले नाही. रशियाने युक्रेनमधील जे भाग ताब्यात घेतले होते तेथे नियंत्रण ठेवणे त्यांना अवघड बनले असून युक्रेन सेना वेगाने प्रतिहल्ले चढवीत असल्याचे समजते आहे.