तुमची एक चूक पडेल हजार रुपयांना: गाडीच्या मागील सीट बसल्यावरही लावावा लागेल बेल्ट


नवी दिल्ली – चारचाकी वाहनांमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास ते महागात पडू शकते. कारच्या मागे बसून सीट बेल्ट न लावणाऱ्या 17 जणांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी चालना दिली. बाराखंबा रोडवर कॅनॉट प्लेसजवळ पोलिसांनी कारवाई केली.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मोटार वाहन कायद्याच्या कलम 194B अंतर्गत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोहीम राबवून एकूण 17 चालान जारी करण्यात आली. प्रत्येक व्यक्तीला 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आला.

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (54) यांचा पालघर, महाराष्ट्र येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यानंतर कारच्या मागच्या व्यक्तींनाही सीट बेल्ट घालता यावा यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस्त्री कारच्या मागे बसले होते आणि त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता.

नवी दिल्लीचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) आलाप पटेल म्हणाले, कायदेशीर तरतुदी आधीच होत्या पण नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर (मिस्त्रींचा अपघात) यावर पुन्हा चर्चा होत आहे. ते म्हणाले, दिल्ली वाहतूक पोलीस सीट बेल्ट घालण्याबाबत जनजागृती करण्यासाठी आधीच मोहीम राबवत आहेत. आम्ही कायदेशीर कारवाई देखील करत आहोत.