Fact Check : दक्षिणेत ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी एसएस राजामौलींनी घेतले 10 कोटी रुपये? जाणून घ्या सत्य


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता. या चित्रपटावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती आणि त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली जात होती. तथापि, चित्रपटासाठी नकारात्मक सोशल मीडिया मोहिमेमुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही आणि चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांत चांगला व्यवसाय केला आहे. आता सोशल मीडियावर आणखी एक बातमी व्हायरल होत आहे की, बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी 10 कोटी रुपये घेतले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत बातम्या
वास्तविक दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी ‘ब्रह्मास्त्र’चे दक्षिणेत भरपूर प्रमोशन केले आहे. ते रणबीर कपूरसोबत अनेक कार्यक्रमांमध्ये दिसले. खुद्द राजामौली यांनी या चित्रपटाचे खुलेपणाने कौतुक केले आहे. राजामौली हे दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट खूप पसंत केला आहे. ही बातमी समोर आल्यानंतर ‘ब्रह्मास्त्र’चे शत्रू पुन्हा एकदा सोशल मीडियावर चित्रपटाविरोधात सक्रिय झाले आहेत. मात्र, या बातमीचे सत्य वेगळेच आहे.

खरचं राजामौलींनी 10 कोटी घेतले?
प्रसिद्ध फिल्म वेब साइट ‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, एसएस राजामौली यांनी 10 कोटी घेतल्याचे वृत्त पूर्णपणे निराधार आहे. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजामौली यांनी स्वतःहून ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन केले आहे. खरं तर, करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसने ‘बाहुबली’चे वितरण केले, तेव्हापासून करण आणि राजामौली यांचे संबंध खूप चांगले आहेत. या संबंधांमुळे राजामौली यांनी स्वत: या चित्रपटाचे दक्षिणेत प्रमोशन करायचे ठरवले. अशाप्रकारे राजामौली यांनी ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी 10 कोटी घेतल्याची बातमी पूर्णपणे निराधार आहे.

150 रुपयांपेक्षा जास्त कमाई
तसेच, आम्ही तुम्हाला सांगतो की, सोशल मीडियावर ब्रह्मास्त्रवर बहिष्कार टाकण्याची मागणी खूप झाली असली, तरी बॉक्स ऑफिसवर त्याचा काहीही फरक पडलेला नाही. या चित्रपटाने देश-विदेशात पहिल्या 5 दिवसात 150 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता दुसऱ्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट चांगली कमाई करेल, असे मानले जात आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.