येतोय रियलमी सिरीज सी चा बजेट स्मार्टफोन

रियलमी भारतात सी ३० एस नावाने त्यांच्या सी सिरीज मधला आणखी एक बजेट स्मार्टफोन सादर करत आहे. १४ सप्टेंबर दुपारी १२ वाजता आंतरराष्ट्रीय पातळीवर हा फोन लाँच केला जात असून फोनची काही फीचर्स कंपनीने उघड केली आहेत.

द क्लूज टेकच्या म्हणण्यानुसार हा फोन दोन मॉडेल मध्ये येत असून २ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज अशी दोन मॉडेल्स आहेत. २ जीबी साठीची किंमत ७९९९ रुपये तर ३ जीबी साठी ८७९९ रुपये किंमत आहे. फोन साठी ६.५ इंची डिस्प्ले दिला गेला असून ड्यू ड्रॉप नॉच आहे. फोन साठी ५ हजार एमएएचची बॅटरी असून फोन दिवसभर त्यावर चालू शकणार आहे.

या फोनला सुरक्षेसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. अँड्राईड १२ ओएस, एलईडी फ्लॅशसह रिअरला ८ एमपीचा कॅमेरा तर फ्रंटला ५ एमपी चा कॅमेरा दिला गेला आहे. निळा आणि काळा अश्या दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे.