टीनएजर कार्लोस अल्कारेजने जिंकली युएस ओपन टेनिस स्पर्धा
स्पेनच्या टीनएजर कार्लोस अल्कारेज याने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी युएस ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून पुरुष एकेरीचे अजिंक्यपद मिळविले आहे. त्याने अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅम्पर रूडला ६-४, २-६, ७-६, आणि ६-३ असे पराभूत केले. रूड यंदा दुसर्या वेळी ग्रँड स्लॅम फायनल मध्ये पोहोचला होता मात्र दोन्ही वेळी त्याला अंतिम सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. तिसरे मानांकन मिळालेल्या अल्कारेजने हा सामना ३ तास २० मिनिटात जिंकला आणि अवघ्या १९ व्या वर्षी पुरुष सिंगल्स जिंकणारा तो पाहिला खेळाडू ठरला.
४९ वर्षांपूर्वी मानांकन म्हणजे एटीपी रँकिंगची सुरवात झाली. त्यानंतर प्रथमच अल्कारेज पहिले मानांकन मिळालेला पहिला टीनएजर खेळाडू ठरला आहे. अर्थात २३ वर्षीय रूडने हा सामना जिंकला असता तर तो सुद्धा पहिले मानांकन मिळविणारा पहिला युवा खेळाडू ठरला असता पण त्याला ही संधी मिळाली नाही.
कार्लोसचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम टायटल आहे. तो प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला होता. २००५ मध्ये राफेल नदालने फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर कार्लोस सर्वात कमी वयाचा पुरुष एकेरी ग्रँडस्लॅम विजेता ठरला आहे. गेल्या ३२ वर्षातील युएस ओपन मधील तो सर्वात तरुण चँपियन बनला आहे. विजयानंतर बोलताना कार्लोस म्हणाला,’ लहानपणापासून मी जगातील सर्वोत्तम खेळाडू बनायचे स्वप्न पाहिले होते आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यात माझ्या कुटुंबाचा पाठींबा फार महत्वाचा आहे.’