प्रिन्स चार्ल्स राजे बनल्यामुळे ७० वर्षानंतर बदलणार राष्ट्रगीतातील शब्द

गेली सत्तर वर्षे ब्रिटनच्या सत्तेवर असलेल्या महाराणीच्या निधनानंतर प्रथमच ब्रिटनच्या राष्ट्रगीतातील शब्द बदलले जाणार आहेत. महाराणी एलीझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनचे पुढचे राजे म्हणून प्रिन्स चार्ल्स यांची नेमणूक झाली असून ते आता किंग चार्ल्स थ्री नावाने ओळखले जातील. राणीच्या निधनाला २४ तास होण्याच्या अगोदरच लंडन स्थित सेंट जेम्स पॅलेस सेरेमोनियल बॉडी मध्ये चार्ल्स यांच्या नावाची नवे राजे म्हणून घोषणा केली गेली आहे. चार्ल्स यांचा शाही शपथग्रहण समारंभ झाला नाही.  १८ व्या शतकातील परंपरेनुसार किंग चर्च ऑफ स्कॉटलंडला शपथ दिली गेली. यावेळी राष्ट्रगीत गायले जाईल त्यात १९५२ नंतर प्रथमच ‘ गॉड सेव द क्वीन’ ऐवजी ‘गॉड सेव द किंग’ असा शब्द बदल होंत आहे.

असे असले तरी प्रत्यक्ष राजगादीवर येण्याचा कार्यक्रम म्हणजे करोनेशन समारंभासाठी किंग चार्ल्स यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण यासाठीची तयारी पूर्ण झालेली नाही. महाराणी एलिझाबेथ राणी बनली तेव्हा तिला सुद्धा करोनेशन साठी १६ महिने प्रतीक्षा करावी लागली होती. कारण हा सरकारी कार्यक्रम असून त्याचा सर्व खर्च सरकार करते. गेली ९०० वर्षे करोनेशन वेस्टमिन्स्टर अॅबे मध्ये होत आहे. चार्ल्स ब्रिटनचे ४० वे सम्राट आहेत. कॅटरबरी आर्कबिशप सेंट एडवर्डसचा क्राऊन चार्ल्स यांच्या डोक्यावर ठेवतील. हा सोन्याचा मुकुट २.२३ किलो वजनाचा आहे.

ब्रिटनच्या राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान बकिंघम पॅलेस हेच आहे. मात्र ७७५ खोल्या असलेल्या या अलिशान महालात राहण्याची प्रिन्स चार्ल्स यांची इच्छा नाही असे त्यांनी जाहीर केले आहे.