ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे निधन: स्कॉटलंडच्या बालमोरल कॅसल येथे अखेरचा श्वास घेतला


ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी स्कॉटलंडमधील बालमोरल पॅलेस येथे निधन झाले. बकिंगहॅम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राणी एलिझाबेथ यांचे आज दुपारी बालमोरल येथे शांततेत निधन झाले.

१९५२ साली वयाच्या २५ साव्या वर्षी त्यांनी ब्रिटनच्या सत्ता सांभाळली . तेव्हापासून आजपर्यंत जवळपास ७० वर्षे त्या या गादीवर विराजमान होत्या . त्या ९६ वर्षांच्या होत्या आणि ब्रिटनमध्ये सत्ता सांभाळणाऱ्या त्या सर्वात वयोवृद्ध महिला होत्या. याशिवाय राणी एलिझाबेथचे नाव जगातील सर्वात जुन्या शासकांमध्ये होते.राणी एलिझाबेथ II नंतर, आता त्यांचा मुलगा चार्ल्स (वय 73 वर्षे) आपोआप ब्रिटनचा राजा होईल.

पीएम मोदींनी व्यक्त केले दुःख, म्हणाले- त्या दिग्गज शासक होत्या.

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- एलिझाबेथ द्वितीय आपल्या काळातील महान शासक म्हणून स्मरणात राहतील. त्यांच्या दु:खाच्या काळात त्यांचे कुटुंब आणि ब्रिटनच्या लोकांसोबत माझे विचार आहेत.