आयफोन १४ ची एन्ट्री आणि या आयफोन्सनी घेतली एग्झीट
अॅपलने आयफोन १४ सिरीज लाँच केल्यानंतर लगोलग मोठा निर्णय घेऊन आयफोन ११, आयफोन १२ मिनीची विक्री त्यांच्या अधिकृत स्टोर्स मध्ये बंद केली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या आणखी एका निर्णयाने बाजारात हलचल निर्माण झाली आहे. कंपनीने आयफोन १४ प्रो आणि प्रो मॅक्सची विक्री वाढावी म्हणून आयफोन १३ प्रो आणि मॅक्स फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आयफोन १४ मिनी लाँच केलेलाच नाही. आणि आयफोन १२ मिनीची विक्री बंद केल्याने आता ग्राहकांना आयफोन १३ मिनीचाच पर्याय उपलब्ध आहे.
नवा फोन बाजारात येताच जुनी मॉडेल्स बंद करण्याची पद्धत अॅपल मध्ये आहेच. यापूर्वी सुद्धा असे निर्णय घेतले गेले आहेत. मात्र अॅपलच्या नव्या मॉडेल्स मध्ये यंदा महत्वाचे बदल केले गेले आहेत. आयफोन १४ प्रो आणि मॅक्स येताच भारतीय बाजारात आयफोन १३च्या किमती लाँचिंग वेळच्या किमतीपेक्षा १० हजारांनी कमी झाल्या असून हा फोन आता ६९९०० रुपयात मिळतो आहे.
गतवर्षी आयफोन एक्सआर रिटायर केला गेला होता यंदा आयफोन ११ रिटायर केला गेला आहे तसेच आयफोन १२ मिनी रिटायर केला गेला आहे. अर्थात अॅपलच्या अधिकृत स्टोर्स मध्ये हे फोन विकले जाणार नसले तरी अन्यत्र ऑनलाईन विक्री मध्ये ग्राहक ते खरेदी करू शकतात.