दुनियेत सर्वप्रथम या कंपनीत रोबो बनला सीईओ

चीनमधील मेटावर्स कंपनी नेटड्रॅगन मध्ये जगात प्रथमच सीईओ म्हणून एआय ह्यूमनॉईड रोबोची नेमणूक केली गेली आहे. ही कंपनी मल्टीलेअर ऑनलाईन गेम्स अन मोबाईल अॅप्स बनविते आणि ऑपरेट करते. या नव्या सीईओचे नाव ‘ तांग यु’ असून ही कंपनी चीनच्या फुजियान प्रांतात आहे.

एआय पॉवर्ड ह्यूमनॉईड रोबो या पूर्वी अनेक क्षेत्रात वापरले गेले आहेत,वापरले जात आहेत. वैज्ञानिकांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून बनविलेली अनेक मशीन्स आणि रोबो यांच्यामुळे मानवाची अनेक कामे सुलभ आणि जलद होत आहेत. पण आजपर्यंत एकाद्या कंपनीची पूर्ण जबाबदारी रोबोवर सोपविली गेल्याची ही पहिलीच घटना आहे.

नेटड्रॅगन कंपनीकडून या संदर्भात एक प्रेस रिलीज जारी केले गेले असून ‘मिस्टर तांग यु’ कंपनीचे संघटन व कौशल्य विभागाचे नेतृत्व करणार आहे असे म्हटले गेले आहे. त्याचबरोबर हा रोबो टॅलंट डेव्हलपमेंट मध्येही भूमिका बजावेल आणि डेटा विश्लेषणात मदत करणार आहे. २०१७ मध्ये अलिबाबाचे प्रमुख जॅक मा यांनी येत्या ३० वर्षात रोबो कंपनी सीईओ म्हणून काम करतील अशी भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी पाच वर्षातच खरी ठरली आहे.