आयफोन १४ सिरीज लाँच, अशी आहेत प्रो आणि मॅक्सची फीचर्स

अॅपलने त्यांच्या बहुचर्चित आयफोन १४ सिरीज मधील चार मॉडेल्स लाँच केली आहेत. आयफोन १४, १४ प्लस, १४ प्रो आणि १४ प्रो मॅक्स अशी ही चार मॉडेल्स विविध व्हेरीयंट मध्ये आणली गेली आहेत. विशेष म्हणजे यंदा प्रथमच कंपनीने आयफोन १४ प्रो आणि मॅक्स साठी पंचहोल डिस्प्ले डिझाईन दिले आहे. पंचहोल डिझाईन आत्तापर्यंत फक्त अँड्राईड फोन साठीच दिले गेले होते. आता ते आयफोन साठी आले आहे.

आयफोन १४ प्रो साठी ६.१ इंची ओलेड डिस्प्ले तर प्रो मॅक्स साठी ६.७ इंची ओलेड डिस्प्ले आहे. बाकी फीचर्स सारखीच आहेत. दोन्ही फोन साठी सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले आहेत. फोन साठी आयपी ६८ रेटिंग असून ए १६ चिप आहे. क्वाड कॅमेरा सेटअप असून मेन कॅमेरा ४८ एमपीचा, १२ एमपीचा अल्ट्रा वाईड व १२ एमपीचे दोन टेलीफोटो लेन्स फ्लॅश सह आहेत. १२८ जीबी,२५६ जीबी,५१२ जीबी आणि १ टीबी स्टोरेज रेंज असून प्रोच्या किंमती अनुक्रमे १,२९,०००, १,३९,९९०, १,५९,९९९ व १,७९,९९९ अश्या आहेत. मॅक्स साठी ही रेंज १,३९,९९० ते १,८९,९९९ अशी आहे. हे दोन्ही फोन फाईव्ह जी ला सपोर्ट करतात. पर्पल, सिल्व्हर, गोल्ड आणि ब्लॅक कलर्स मध्ये हे फोन मिळतील. ही सर्व मॉडेल भारतात ९ सप्टेंबर पासून प्री बुकिंग साठी उपलब्ध होत आहेत आणि १६ सप्टेंबर पासून डिलिव्हर केली जाणार आहेत.