मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, PM SHRI योजनेला मंजुरी; होणार आहे 14500 शाळांचा कायापालट


नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत 14500 शाळांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली आहे.

पीएम श्री योजना काय आहे?
शिक्षण दिनानिमित्त नरेंद्र मोदींनी पंतप्रधान श्री योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत 14,500 शाळांचा दर्जा वाढवून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पूर्ण भावनेला मूर्त स्वरुप देणारी पीएम-श्री शाळा एक मॉडेल स्कूल बनेल, असे पंतप्रधान म्हणाले होते. यामध्ये केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांचा समावेश करण्यात येणार आहे. पीएम-श्री शाळांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले होते.

वाढवला रेल्वेच्या जमीन भाडेपट्ट्याचा कालावधी
याशिवाय रेल्वेच्या जमीन धोरणात दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रेल्वेच्या जमिनीचा भाडेपट्टा कालावधी 5 वर्षांवरून 35 वर्षे करण्यात आला आहे.

अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की आज PM मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने PM गति शक्ती फ्रेमवर्क लागू करण्यासाठी रेल्वेच्या नवीन भूमि धोरणाला जोडण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पुढील 5 वर्षात रेल्वेच्या जमिनीवर 300 कार्गो टर्मिनल विकसित केले जातील. यावर 90 दिवसांत काम सुरू होईल.