The Kapil Sharma Show : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसणार नाही भारती सिंह, या कमिटमेंटमुळे घ्यावा लागला निर्णय


पुन्हा एकदा ‘द कपिल शर्मा शो’ नव्या मूडमध्ये छोट्या पडद्यावर परतणार आहे. टीव्ही चॅनलवरील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनेक विनोदी कलाकार आणि तारे हसत-खेळत पाहायला मिळणार आहेत. यावेळी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक नवे चेहरेही दिसणार आहेत. मात्र काही जुने चेहरे चाहत्यांना पाहायला मिळणार नाहीत. यापैकी एक भारती सिंगचे नाव आहे. भारती सिंह काही दिवसांपूर्वीच आई झाली, असून ती सतत आपल्या मुलासोबत दिसते. दरम्यान, प्रेक्षकांनाही भारतीला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये बघायचे होते, पण आता ती या शोमध्ये का दिसणार नाही हे भारतीनेच सांगितले आहे.

मीडियाशी संवाद साधताना भारती सिंहने सांगितले की, ती कपिल शर्मासोबत त्याच्या शोमध्ये काम का करत नाही. या प्रश्नाला उत्तर देताना भारतीने सांगितले की, या शोपूर्वी तिने आणखी काही शोसाठी कमिटमेंट दिली होती. या शोपूर्वी तिला ब्रेक घ्यायचा होता.

यामुळे दिसणार नाही कपिल शर्मा शोमध्ये
भारती सिंहने सविस्तरपणे सांगितले की तिला कपिल शर्मा शोच्या आधी ब्रेक घ्यायचा होता आणि जेव्हा हा शो टीव्हीवर येणार आहे, तेव्हा तिने यावेळी ‘सा रे ग म पा’ साठी कमिटमेंट दिली होती. जर या दोघांची टक्कर झाली नाही, तर ती ‘कपिल शर्मा शो’मध्ये प्रेक्षकांना पाहता येईल, असेही तिने सांगितले.

आई झाल्यानंतर भारती सिंग
भारती सिंहने असेही सांगितले की, आई झाल्यानंतर ती थोडी बिझी झाली आहे. तिने तिच्या चाहत्यांना विनंतीही केली आहे की, आता एका कलाकारासोबतच ती आई देखील आहे, त्यामुळे तिला प्रत्येक शोमध्ये पाहण्याची सवय लावू नका. मात्र ती चाहत्यांसाठी नेहमीच काम करेल.