शाहरुख खान बनवणार गोविंदा आणि रवीना टंडनच्या चित्रपटाचा रिमेक, विकत घेणार ‘दुल्हे राजा’चे हक्क!


शाहरुख खानने स्वतःला ब-याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर ठेवले आहे आणि आता पुढील वर्षी तीन चित्रपट घेऊन चित्रपटगृहांमध्ये धमाल करणार आहे. पुढच्या वर्षी तो ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ रिलीज करणार आहे, ज्याच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. त्याचवेळी आता त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, जी ऐकून त्यांना आनंद होईल. गोविंदा आणि रवीना टंडन स्टारर ‘दुल्हे राजा’ या चित्रपटाचे हक्क शाहरुख खानने विकत घेतल्याचे वृत्त आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटने 1998 मध्ये आलेल्या गोविंदा आणि रवीना टंडन स्टारर ‘दुल्हे राजा’ च्या रिमेक आणि निगेटिव्ह अधिकार विकत घेतले आहेत. चित्रपटाच्या हक्काबाबत बराच काळ हा करार अडकला होता. फरहाद सामजी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याचे बोलले जात आहे. स्क्रिप्टवर आधारित, सध्याचा काळ लक्षात घेऊन कास्टिंग केले जाईल.

‘दुल्हे राजा’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे दिग्दर्शन हरमेश मल्होत्राने केले होते. ‘दुल्हे राजा’ हा गोविंदा आणि रवीना टंडनचा सर्वात मजेदार चित्रपट आहे, ज्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. चित्रपटात गोविंदा आणि रवीना टंडन व्यतिरिक्त कादर खान, प्रेम चोप्रा, जॉनी लीव्हर. असरानी यांच्यासारख्या उत्कृष्ट अभिनेत्याने यात प्रमुख भूमिका केल्या होत्या.

कामाच्या आघाडीवर, शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. तो शेवटचा 2018 मध्ये आलेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला होता. त्याचबरोबर आता तो एका वर्षात तीन चित्रपट घेऊन पुनरागमन करत आहे. याशिवाय तो सलमान खानच्या ‘टायगर 3’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.