ब्रह्मास्त्रसाठी रणबीर आलियाने घेतले एवढे मानधन, अमिताभ बच्चन यांनीही घेतले कोटी


आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्र चर्चेत आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ब्रह्मास्त्रमध्ये पहिल्यांदाच रिअल लाईफ कपल आलिया आणि रणबीर कपूर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ब्रह्मास्त्र हा अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ज्याला बनवण्यासाठी जवळपास 4 वर्षे लागली. बॉलीवूडचा बॉयकॉट ट्रेंड असूनही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कसा कमाई करतो, याची आता प्रतीक्षा आहे. पण त्याआधी अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट पडद्यावर आणण्यासाठी पात्रांनी किती मानधन वसूल केले ते जाणून घेऊया.

रणबीर कपूर
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या रणबीर कपूरने 20 ते 25 कोटी रुपये घेतले आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. दरम्यान आपण ट्रेलरमध्ये त्याच्या अभिनयाची झलक पाहिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूप आवडला आहे.

आलिया भट्ट
या चित्रपटात रणबीर कपूरच्या प्रेयसीची भूमिका करणाऱ्या आलिया भट्टने 10 ते 12 कोटी रुपये मानधन घेतले आहे. आलिया पहिल्यांदाच अयान आणि रणबीरसोबत काम करत असून रणबीरसोबतची तिची केमिस्ट्री आधीच चर्चेत आहे.

अमिताभ बच्चन
‘ब्रह्मास्त्र’मध्ये गुरूची भूमिका साकारणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या व्यक्तिरेखेसाठी 8-10 कोटी रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन रणबीरच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

नागार्जुन
साऊथचा सुपरस्टार नागार्जुनने या चित्रपटातील भूमिकेसाठी 9-11 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

मौनी रॉय
या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या मौनी रॉयने 3 कोटी रुपये घेतले आहेत. चित्रपटात मौनीचे नाव जुनून आहे.

शाहरुख खान
या चित्रपटात शाहरुख खानची खास भूमिका असणार आहे. या चित्रपटात तो वनराष्ट्राच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी त्याने किती फी आकारली हे अद्याप कळू शकलेले नाही.

डिंपल कपाडिया
बॉलिवूडची प्रतिभावान अभिनेत्री डिंपल या चित्रपटात अनिता सक्सेनाच्या भूमिकेत दिसणार आहे. डिंपलने तिच्या पात्रासाठी 85 लाख रुपये घेतले आहेत.

प्रतिक बब्बर
प्रतिक बब्बर या चित्रपटात राजा सिंहची भूमिका साकारत असून या भूमिकेसाठी त्याने 1 कोटी रुपये घेतले आहेत.

सर्वात महागडा बॉलिवूडपट
रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र पार्ट 1 हा आतापर्यंतचा सर्वात महागडा बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट 400 कोटी असून, त्यात चित्रपटाच्या प्रमोशनचा समावेश नसल्याचे बोलले जात आहे.