Bigg Boss 16 : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा होणार ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश!


सलमान खान पुन्हा एकदा ‘बिग बॉस’चा नवा सीझन घेऊन येत आहे. अशा स्थितीत स्पर्धकांबाबत अनेक नावे समोर येत आहेत, मात्र सर्वात जास्त चर्चा आहे, ती शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची. आजकाल, तो विचित्र चेहऱ्याचे मुखवटे घालण्यासाठी सतत चर्चेत असतो आणि अलीकडेच त्याचे वादाशी घट्ट नाते बनले आहे. पोर्नोग्राफी केल्याप्रकरणी त्याला तुरुंगातही जावे लागले होते. बिग बॉसच्या घरात नेहमीच वादग्रस्त लोकांना स्थान मिळाले आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला ‘बिग बॉस 16’ साठी अप्रोच करण्यात आले आहे.

शोच्या निर्मात्यांशी सुरू आहेत बोलणी
सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की, राज आणि शोच्या निर्मात्यांमध्ये चर्चा सुरू असून तो ‘बिग बॉस 16’ मध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहे. देशाला सत्य सांगण्याची गरज आहे, असे त्याला वाटते. येथे इशारा राज यांच्यावरील आरोपांकडे आहे, ज्याबद्दल त्यांना त्यांची बाजू लोकांसमोर मांडायची आहे आणि त्याला या शोपेक्षा चांगले व्यासपीठ कुठे मिळणार आहे.

पोर्नोग्राफी केल्याप्रकरणी भोगला आहे तुरुंगवास
पॉर्नोग्राफी व्हिडिओ बनवल्याप्रकरणी राजला गेल्या वर्षी जुलैमध्ये अटक करण्यात आली होती आणि सप्टेंबरमध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तेव्हापासून त्याने सार्वजनिक ठिकाणी प्रसारमाध्यमांना टाळण्यासाठी फेस मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर तो अनेकदा ट्रोल होताना दिसत आहे. लोक म्हणताना दिसतात की त्याने असे का केले, ज्यासाठी त्याला तोंड लपवावे लागत आहे.

न्यायालयाकडे केली आहे या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्याची मागणी
राज यांनी नुकतीच या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळावी यासाठी दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला अद्याप दोषी ठरविण्यात आलेले नाही. आपण निर्दोष असल्याचा दावा करत आपला अश्लीलतेशी काहीही संबंध नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. त्याचवेळी, एका मुलाखतीत राज यांनी सांगितले की, मी कधीही पोर्नोग्राफीच्या निर्मिती किंवा वितरणात गुंतलेला नव्हतो. या प्रकरणात आपल्याला गोवले जात असल्याचे राज याला वाटते. तो सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी तयार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे.