आशिकी आणि आशिकी 2 या सुपरहिट चित्रपटांनंतर आता आशिकी 3 ची घोषणा करण्यात आली आहे. नुकतीच बातमी आली होती की, अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत कोण दिसणार आहे, याचा खुलासा अद्याप झालेला नव्हता. मात्र आशिकी 3 या चित्रपटात जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
आशिकी 3 हा 1990 मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटाचा आणि 2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासू आहेत. आशिकीमध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. यानंतर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर आशिकी 2 मध्ये मुख्य भूमिकेत दिसले होते. आता आशिकी 3 मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यन आणि जेनिफर विंगेट या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
या चित्रपटाद्वारे जेनिफर विंगेट बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, आतापर्यंत निर्माते आणि अभिनेत्रींनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्याचवेळी अनुराग बसूनेही चित्रपटातील जेनिफरच्या एन्ट्रीवर आपले मौन तोडले आहे. याबाबत अनुराग बसू सांगतात की, मीही या पद्धतीच्या अफवा ऐकल्या आहेत. तथापि, आम्ही चित्रपटाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत आणि तो बनवण्याच्या पैलूंचा शोध घेत आहोत. अनुराग बसू पुढे म्हणाले की, एकदा कास्टिंग झाले की गोष्टी समोर येतील.
जेनिफर विंगेट टीव्ही सीरियल बेहद आणि बेपन्नामध्ये दिसली आहे. याशिवाय ती सरस्वतीचंद्र या मालिकेतही दिसली होती. जेनिफरने आमिर खानच्या अकेले हम अकेले तुम या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट राजा की आएगी बारातमध्येही दिसली होती. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत जेनिफरची पहिली मोठी भूमिका होती. याशिवाय ती ओटीटीवरही दिसली आहे.