केएल राहुल- अथियाच्या घरी बँडबाजा, बारातीची तयारी सुरु

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या घरी लवकरच बँडबाजा आणि बारातीची तयारी सुरु होत आहे. हे दोघे गेली अनेक वर्षे डेटिंग करत आहेत आणि बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी नुकतेच पत्रकारांना राहुल आणि अथिया त्यांना हवे तेव्हा विवाह करू शकतात असे सांगितले होते. पण नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्ट नुसार सुनील शेट्टी यांनी त्यांच्या आवडत्या, खंडाळा येथील अलिशान घरात या विवाहाची तयारी सुरु केल्याचे समजते. याचाच अर्थ राहुल आणि अथिया कोणत्याही पंचतारांकित ठिकाणी सात फेरे घेणार नाहीत तर सुनील यांच्या १७ वर्षांपूर्वी बांधलेल्या या अलिशान घरात विवाह करणार आहेत. या समारंभाला निवडक पाहुणे उपस्थित राहतील असेही समजते.

मिळालेल्या माहितीनुसार राहुल आणि अथिया बांद्रा येथील नवीन घरी शिफ्ट झाले आहेत. राहुलचे शेड्युल पाहून विवाहाची तारीख ठरविली जाणार आहे. लोकप्रिय वेडिंग प्लॅनर त्यांच्या टीमसह नुकतेच खंडाला येथील घराला भेट देऊन आले आहेत. सुनील शेट्टी यांना त्यांचे हे घर फार प्रिय आहे. मोठ्या परिसरात अतिशय कलात्मकतेने हे घर त्यांनी सजविले आहे. डिसेंबर जानेवारी मध्ये लग्नाची निमंत्रणे पाठविली जातील असे सांगितले जात आहे. विराट – अनुष्का नंतर क्रिकेट जगतात राहुल अथिया विवाह हा मोठा समारंभ मानला जात आहे.