Brahmastra : रणबीर-आलियाच्या ब्रह्मास्त्रला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, चित्रपटाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाची टीम या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन आणि प्रचार करत आहे. चित्रपटातील सर्व कलाकार त्यांच्या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतात. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत आता रिलीजपूर्वी या चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सोशल मीडियावर बहिष्काराच्या ट्रेंडला बळी पडणाऱ्या या चित्रपटासाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या ताज्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’च्या बेकायदेशीर स्ट्रिमिंगवर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने 18 वेबसाईट्सवर स्ट्रिमिंगबाबत ताशेरे ओढले आहेत. इतकंच नाही तर कोर्टाने चित्रपटासोबत चित्रपट पाहणे, अपलोड करणे, होस्टिंग आणि री-टेलिकास्ट करण्यावरही बंदी घातली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर चित्रपटाला अनेक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यास काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटाची टीम सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच टीम प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचली होती. येथील पहिला कार्यक्रम रद्द झाल्यामुळे चाहते थोडे निराश झाले होते, पण नंतर हा कार्यक्रम एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अनोख्या आउटफिटने सर्वांची मने जिंकली. त्याचवेळी रणबीरने चाहत्यांशी तेलुगुमध्ये बोलून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आलिया आणि रणबीरशिवाय अभिनेता अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन आणि अभिनेत्री मौनी रॉय या चित्रपटात विशेष भूमिका साकारताना दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.