अमेरिकेत मुलांच्या पालनपोषणाच्या खर्च परवडेनासा

अमेरिकेत महागाईच्या झळा इतक्या तीव्र स्वरुपात जाणवू लागल्या आहेत कि मध्यमवर्गीय आईवडिलांना मुलांच्या पालन पोषणाच्या खर्च डोईजड होऊ लागला आहे. परिणामी दुसरे मूल जन्माला घालायची इच्छा असूनही खर्च परवडणार नाही या भीतीने मुले जन्माला न घालण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

बृकिंग्ज इंस्टीटयूशनच्या एका सर्व्हेक्षणात एका मुलाचा सांभाळ करण्यासाठी ८ लाख डॉलर्स म्हणजे ६.४० कोटी रूपये खर्च येतो. त्यातील कॉलेज शिक्षण खर्च वगळला तरी हा खर्च ३.१० लाख डॉलर्स म्हणजे २.४८ कोटी रुपये आहे. २०१७ च्या तुलनेत या खर्चात ६४ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. यात मुलाचा १७ वयापर्यंतचा खर्च धरला गेला आहे. हे सर्व्हेक्षण मध्यमवर्गीय आणि दोन्ही पालक कमावते असलेल्या परिवारात केले गेले आहे.

अमेरिकेत कॉलेज शिक्षण साधारण चार वर्षाचे असते. त्यासाठी येणारा खर्च ४ कोटी रूपये आहे. याच संस्थेने मातृत्व सर्व्हेक्षण केले तेव्हा २६ ते ४१ वयोगटातील लोकांनी आता मुले जन्माला घालणे परवडणार नाही असे मत दिले. २०२० मध्ये ४३ टक्के महिलांनी आणखी मुले जन्माला घालायची आहेत असे मत दिले होते ती संख्या २०२२ मध्ये ३० टक्क्यांवर आली आहे. यामागे वाढलेली महागाई हेच मुख्य कारण आहे.