सहा वर्षाची झाली जिओ, १०० टक्यांनी वाढला डेटा खप

टेलिकॉम सेक्टर मधील बलाढ्य रिलायंस जिओने ५ सप्टेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण केली आहेत. दिवाळीच्या सुमाराला कंपनी ५ जी सेवा सुरु करणार असल्याची घोषणा केली गेली आहे. ट्रायच्या एका अहवालानुसार जिओच्या एन्ट्रीनंतर प्रतीव्यक्ती, प्रती महिना डेटा वापरात १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. जिओच्या एन्ट्री पूर्वी प्रती व्यक्ती, प्रती महिना १५४ एमपी डेटा वापर होता तो आता १५.८ जीबीवर गेला आहे. ही वाढ आश्चर्यजनक आहेच पण जिओ युजर्स दर महा २० जीबी डेटा वापर करत आहेत. फाईव्ह जी सेवा सुरु झाल्यावर हा वेग आणखी वाढेल असे अंदाज व्यक्त होत आहेत.

फाईव्ह जी क्षेत्रातल्या जाणकारांच्या मते फाईव्ह जी अति वेगवान सेवा असल्याने नवीन उद्योग वाढतील.आणि परिणामी मोठ्या संखेने युजर्स आकर्षित होतील. तसेच व्हिडीओ मागणीत वेगाने वाढ होईल आणि डेटा खप आणखी वाढेल.

फोर जी तंत्रज्ञानात जिओचे रेकॉर्ड अतिशय उत्तम राहिले आहे. फाईव्ह जी सेवेसाठीच्या त्यांच्या योजना तयार आहेत. कनेक्टेड ड्रोन, कनेक्टेड अॅब्युलंस- हॉस्पिटल, कनेक्टेड कृषी क्षेत्र, शाळा, कॉलेज, ई कॉमर्स, अविश्वसनीय वेगाने इंटरटेनमेंट, रोबोटिक्स, क्लाऊड पीसी, इमार्सिव्ह टेक्नोलॉजी सह व्हर्च्युअल थिंग्ज तंत्रज्ञानात जिओने मोठी आघाडी घेतलेली आहे. आज भारतात जिओने ४१ कोटी ३० लाख मोबाईल आणि ७०लाख फायबर ग्राहकांसह बाजाराचा हिस्सा घेतलेला आहे आणि महसुलात त्यांचा हिस्सा ४०.३ टक्के आहे.