आयफोनची अनेक मॉडेल्स होणार बंद?

अॅपलच्या आयफोन १४च्या लाँचिंगची जगभर प्रतीक्षा केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आयफोन १४ बाजारात आला की अॅपल आयफोनची अनेक जुनी मॉडेल्स बंद करत असल्याची बातमी येऊन थडकली आहे. अर्थात कंपनीने या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही पण अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या अनेक रिपोर्ट्स मधून तसे संकेत दिले गेले आहे ज्यात जुने आयफोन कंपनी बंद करू शकते असे म्हटले गेले आहे.

यातही विशेष करून आयफोन १४ आला कि आयफोन ११ची मॉडेल्स बंद केली जातील असे अंदाज होते पण अलीकडे आयफोनची अन्य मॉडेल्स सुद्धा बंद केली जातील असे संकेत दिले गेले आहेत. आयफोन १४ च्या विक्रीवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून  कंपनी हा निर्णय घेऊ शकते असे म्हटले जात आहे. आयड्रॉप न्यूजच्या रिपोर्ट मध्ये आयफोन ११ बंद केला जाईल कारण हा फोन फाईव्ह जी ला सपोर्ट करत नाही आणि त्याच्यामुळे नव्या एसई ३ ची विक्री कमी होते आहे.

टाईम्स गाईडच्या रिपोर्टमध्ये असाच दावा केला गेला आहे. अॅपल, फोनच्या रिलीज डेट नंतर ३ वर्षापेक्षा जास्त काळ त्या मॉडेलची विक्री सुरु ठेवत नाही असा इतिहास आहे. आयफोन ११ सप्टेंबर २०१९ मध्ये सादर झाला आहे. कंपनीचा मागचा पॅटर्न पाहिला तर आयफोन १३ प्रो व १३ प्रो मॅक्स २०१९ मध्येच आले आणि ते बंद झाले. अॅपलने कोणतेच प्रो व्हर्जन एक वर्षापेक्षा जास्त चालविलेले नाही. आयफोन १४ मध्ये १३ प्रो चाच चिपसेट असेल असे संकेत दिले गेले आहेत. आयफोनची मिनी मॉडेल्स फारशी चाललेली नाहीत. त्यामुळे आयफोन १२ मिनी सुद्धा बंद केला जाईल असा अंदाज व्यक्त होत आहे. अर्थात फोन साठा असेल तो पर्यंत हे फोन ई कॉमर्स वर मिळू शकतील असे सांगितले जात आहे.