मुंबईत कोरोनाचा कहर, गणेशोत्सवादरम्यान वाढले मृत्यूचे प्रमाण


मुंबई : एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रात गणेश उत्सवाची धूम सुरू आहे, तर दुसरीकडे कोरोनामुळे लोकांचा जीव जात आहे. कोविडचे रुग्ण जास्त नोंदवले जात नसले, तरी गेल्या काही दिवसांपासून शहरात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत 2 वर्षांनंतर गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जात आहे, मात्र अद्यापही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. दरम्यान, बाजारपेठ, गणेश मंडळे, मंदिरांमधील गर्दीवर नियंत्रण नाही. मात्र, गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झालेले सर्व रुग्ण हे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या आजाराने ग्रस्त होते आणि सर्वांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त होते.

मागील 6 दिवसातील मुंबईचा कोरोना रिपोर्ट

  • 28 ऑगस्ट- 610 नवीन कोरोना रुग्ण आढळले, त्यापैकी 93 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. यादरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला.
  • 29 ऑगस्ट – 351 नवीन रुग्ण आढळले आणि 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. कोविडमुळे 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • 30 ऑगस्ट – 516 नवीन कोरोना रुग्ण आढळले आणि 94 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत तर 3 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला.
  • 31 ऑगस्ट- 638 नवीन रुग्ण आढळले आणि 4 रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणांमध्ये, 93 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.
  • 01 सप्टेंबर – 272 नवीन कोविड रुग्ण आढळले आणि 4 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. जवळपास 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत.
  • 02 सप्टेंबर – 402 नवीन रुग्ण आढळले तर 4 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. सुमारे 91 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.